बोधकथा

कुत्र्याची दूरदृष्टी एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो ? स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला. तात्पर्य: अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो.

No comments:

Post a Comment

Popular Posts